झणझणीत मिसळ


नमस्कार, 
               चला तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील प्रसिध्द अशी झणझणीत मिसळ कशी बनवायची हे बघू, त्याअगोदर मिसळ बद्दल थोडीशी माहिती.  मिसळ ही महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक , कोल्हापूर आणि  पुणे जिल्ह्यात प्रसिध्द आहे. नाशिक आणि पुणे येथे पाव सोबत तर कोल्हापूर मधे ब्रेड सोबत मिसळ खाल्ली जाते. सुरुवातीला मिसळ ही नुसती खाल्ली जायची पण नंतर पाव आणि ब्रेड सोबत खाल्ली जाऊ लागली. आजच्या काळात तर मिसळ थाळी च मिळते. असो तर मिसळ ही मटकी , कांदा ,टोमॅटो काही मसाले टाकून बनवलेली असते व ती खाताना फरसाण आणि कांदा टाकून पाव अथवा ब्रेडसोबत खाल्ली जाते. 
                                               तर चला सगळ्यात अगोदर बघू की मिसळ बनवण्यासाठी सामग्री काय काय लागते व त्याच प्रमाण किती किती असावे. 

सामग्री:- 5-6 जणासाठी

➨मटकी:- (250 ग्रॅम)पाव किलो 
➨कांदा:- अर्धा किलो 
➨टोमॅटो:- पाव किलो
➡तेल :- 150-200 ग्रॅम
➡फरसाण:-250 पाव किलो (मोठी शेव असलेला)
➡खडे मसाले:- दालचिनी , तेजपत्ता , मिरे ,लवंग , शहाजीरा आणि जयित्री ,धनिया पावडर ( सर्व मिळून 50 ग्रॅम)
➡ कोथिंबीर:-100 ग्रॅम 
➡हिरवी मिरची:- 5-6 (पेस्ट साठी )
➡ अदरक- लहसून:-50-60 ग्रॅम 
➡पाव :- गरजेनुसार 
➡मीठ :- 3-4 चमच 
➡लाल मिरच्यांची चटणी:-3-4 चमचे 

वरीलप्रमाणे सर्व सामग्री जमा झाल्यास आपण मिसळ बनवायला सुरुवात करू शकतो, कशी बनवायची ते आपण क्रमाक्रमाने बघू

➡ मोड आलेल्या मटकीला शिजवून घेणे 

मटकी ल मोड आणण्यासाठी अगोदर 7-8 तास पाण्यात ठेवावी आणि त्यानंतर ओला कपड्यात गुंडाळून 15-20 तासासाठी ठेवावी ,जर आपल्याकडं आयती मोड आलेली मटकी असेल तर उत्तमच! मिसळ बनवण्या आधी या मटकी ल थोडेसे जास्त पाणी घालून शिजवून घ्यावे कारण हेच मटकीच पाणी आपण मिसळ चा रस्सा साठी वापरणार आहोत , म्हणून मटकी शिजवताना त्यात थोड तेल , तेजपत्ता ,2 चमचे मीठ ,1 चमच हळद आणि कोथिंबीर टाकावी.ज्याने रस्सा ल थोडी अधिक चव येईल. 


➡कांदा भाजून घेणे 

                             सर्वप्रथम 4-5 कांदे घ्यावेत त्यावरचे टरफल काढून कांदा गॅसवर किंवा चुलीमधी टाकून भाजून घ्यायचा,हा कांदा मिसळीचा ओला मसाला बनवताना कामाला येईल. 
 


➡ओला मसाला बनवणे 

                                    भाजलेला कांदा, आद्रक लहसुन , 5-6 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि सर्व खडे मसाले मिक्सी च्या साह्याने बारीक करून घ्यावेत हा झाला आपला ओला मसाला 

➡कांदा टोमॅटो तेलात भाजणे 

                                            3-4 लिटर पाणी बसेल या मापाच एक पातील घेऊन त्यात 150-200 ग्रॅम तेल टाका , तेल गरम झाल्यास त्यात 5-6 कांदे बारीक चिरून टाका, तेलात कांदा मधमध होईपर्यंत भाजून झाल्यास त्यात टोमॅटो टाका आणि व्यवस्थित रित्या शिजुद्या जेणेकरून टोमॅटो चे पाणी होईल 

 


➡ ओला मसाला तेलात टाकणे 

                                               कांदा टोमॅटो तेलात व्यवस्थित शीजल्यास त्यात ओला मसाला टाकून चांगला भाजू द्यावा व लाल मिरच्यांची चटणी आणि थोडेसे मीठ घालावे व 5 मिनिटे परतून घ्यावे 


➡ शिजलेली मटकी फोडणीत टाकणे  

                                                      आता शिजलेली मटकी फोडणीत टाकून परतून घ्यावी किंवा आपण मटकी ही शिजलेली आहे तशी पण मिसळी सोबत देऊ शकतो फोडणीत घालयची का नाही हे आपल्या मनावर, सगळा मसाला व्यवस्थित भाजून झाल्यास त्यात मटकी च शिजेलेल पाणी घालून पळीने हलवून घ्यावे. मटकी च पाणी अने मसाले व ओला मसाला ह्याच मिश्रण म्हणजेच मिसळीचा कट.  

➡ कोथिंबीर टाकून उकळी येऊ देणे 

                                                       मटकी च पाणी टाकून हलवून घेतल्यास वरून बारीक चिरून कोथिंबीर टाकावी आणि रस्साला उकळी येईपर्यंत मध्यम आचेवर ठेवावे, अशा प्रकारे आपल्या मिसळीचा कट किंवा रस्सा तयार आहे 
 
अशा प्रकारे आपली मिसळ तयार झाली आहे पण हा शेवट नाही मिसळ ही वाढताना मिसळ रस्सा , फरसाण , कांदा , लिंबू आणि पाव यासोबत वाढतात ती कसी ते खालीप्रमाणे 
मिसळ वाढताना अगोदर वाटी मधे फरसाण घ्यावा त्यात मिसळ च रस्सा आणि मिसलचा वर असलेला तेलाचा कट थोडा टाकावं मटकी टाकावी अन् शेवटी वरून कांदा टाकावं v लिंबू आणि दही सोबत द्यावे.
 
ही आपली मिसळ चवीला एकदम झणझणीत एकदा घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जर ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट करून आपली प्रतिक्रिया द्यावी. 

||धन्यवाद||







Comments

Popular Posts