निलंगा राइस (लातूर फेमस)



तर चला मित्रांनो आज आपण लातूरचा सगळ्यांच्या आवडीचा असा निलंगा राइस कसा बनवायचा हे बघू, जर तुम्ही कधी खाल्ला नसेल तर नक्की एकदा घरी करून खाऊन बघा. याला निलंगा राइस नाव लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका आहे तिथून याची सुरुवात झाल्याने याला निलंगा राइस नाव पडले . ह्यात स्पेशल काय आहे आणि कसा बनवायचा ते आपण बघू 

सगळ्यात अगोदर निलंगा राइस साठी साहित्य, भाजीपाला आणि मसाला काय काय लागतो हे सर्वात महत्वाचं ते आपण बघू

सामग्री:- 1 किलो निलंगा राइस बनवण्यासाठी 

तांदूळ(rice):-1kg ( निलंगा राइस बनवण्यासाठी कधीही लांब तांदूळ वापरू नये , चांद तारा तांदूळ हा एकदम छान आहे यासाठी तो नसेल तर बारीक कोलम तांदूळ वापरावा)

तेल:- 150-200 gm ( 3-4 छटाक ) n

खडे मसाले:- दालचिनी, लवंग , शहाजीरा, तेजपत्ता ,मिरे 

मसाला :- बिर्याणी मसाला ( 10 वला )

अदरक लसूण :- 70gm(पेस्ट)

लाल मिरच्यांची चटणी:- 2 चमचे 

कलर (रंग):- केसरी रंगाचा फूड कलर 1 डब्बी   

कसुरी मेथी :- 25 ग्राम 

भाजीपाला 

कांदे:- पाव किलो 

टमाटे:- पाव किलो 

हिरवी मिरची:- 100 ग्राम 

आलू :- पाव किलो 

मसूर डाळ:- 100 ग्रॅम

मेथी जुडी :- एक ओली मेथीची जुडी 

कोथिंबीर आणि कडीपत्ता:- गरजेनुसार

तर वरील प्रमाणे संपूर्ण सामग्री जमा झाल्यास आपण सुरुवात करू शकतो , आपण एक एक स्टेप करत पुढे जाऊ .




Step 1:- सगळ्यात आधी एक किलो च राइस बसेल या मापाच पातील घेणे म्हणजे राइस व्यवस्थित होईल , पातील गॅस वर ठेऊन थोड गरम झाल्यास त्यात 3-4 छटाक तेल टाका व गरम होऊ द्या. मध्यम प्रमाणात तेल गरम झाले की त्यात कापलेला कांदा टाका अन् सोनेरी रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.





 



Step 2:- वरीप्रमाणे कांदा तेलात तळून झाल्यास त्यात खडे मसाले टाकवेत, दालचिनी , तेजपत्त, मिरे , लवंग , जिरे, कडीपत्ता , ह्यात अर्धे खडे मसाले बारीक वाटून टाकले तर चव जास्त येईल , म्हणून अर्धे वाटून टाकायचे आणि अर्धे आहे तसे टाकायचे ,सोबतच अद्रक लसूण च पेस्ट पण टाकून मध्यम आचेवर एक 5-6 मिनिटे तेलात फिरवल्यास एक सुगंध येईल  


 
Step 3:- कांदे व खडे मसाले तळन
 झाल्यास त्यात चवप्रमाणे मीठ टाकावे , तसेच हिरव्या मिरच्या, टमाटे,मसूर डाळ आलू टाकून मध्यम आचेवर ठेऊन 5 मिनिटे झाकण झाकून शिजू द्यावे. 5 मिनिटे झाल्यानंतर आता त्यात मसाले टाकावे लाल मिरच्यांची चटणी, बिर्याणी मसाला, व खडे मसाला वाटून बारीक केलेले असतील तर , हे सर्व व्यवस्थित शिजल्यास त्यात ,दीड लिटर पाणी घालावे आणि पाणी गरम होऊन उकळी फुटे पर्यंत वाट बघावी. 
 



 

Step 4:- फोडणीला म्हणजेच पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात थोडा फूड कलर टाकायचा व 1 किलो तांदूळ धुवून या फोडणीत टाकायचे व व्यवस्थित रित्या मोठ्या पळीच्या साहाय्याने हलवून घायचे , प्रत्येकी 2 मिनिटाला हा तांदूळ खाली वरी करायचं पळ
 च्य मदतीने म्हणजे याने कुठ चिकटणार नाही  व कच्चा राहणार नाही. जोपर्यंत पाणी 80 टक्के जळत नाही तोवर तांदूळ हलवायचा 
 
Step 5:- 80% पाणी कमी झाल्यास आता राइस हा पाण्याच्या वर आलेला असतो त्याला पळीच्या साहाय्याने एक सपाट करून ,त्यावर कोथिंबीर टाकावी आणि मोठ्या झाकणाने झाकून एकदम कमी आचेवर 15-20 मिनिटे दम द्यावा ज्यामुळे राइस मोकळा तसेच चवदार होईल आणि व्यवस्थित शिजेल सुद्धा 
 
 
अशा प्रकारे आपला निलंगा राइस तयार झाला आहे, हा वाढतानाएका बाजूने काढू काढू वाढावा जेणे करून जास्त वेळ गरम राहील. 

तर मित्रांनो कशी वाटली निलंगा राइस बनवण्याची पद्धत आणि आपला अनुभव काय आहे तो नक्की कमेंट करून सांगा , आवडल्यास शेअर नक्की करा 

|| धन्यवाद ||





Comments

Post a Comment

Popular Posts